Maruti Suzuki Jimny and Fronx : मारुतीची जीम्नी, फ्रॉन्क्स ‘या’ महिन्यात होणार लॉन्च

Maruti Suzuki Jimny and Fronx : मारुतीची जीम्नी, फ्रॉन्क्स ‘या’ महिन्यात होणार लॉन्च

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतातील प्रसिद्ध कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. कंपनीने जिम्नी आणि फ्रॉन्क्स या एसयुव्ही लॉन्च करण्याबाबतची माहिती दिली आहे. यासाठी मारुती सुझुकी मार्केटमध्ये या कार आणण्याची जंगी तयारी करत आहे. मीडिया रिपोर्टसनुसार दोन्ही एसयुव्ही कार डिलरशीप पर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे आता जिम्नी आणि फ्रॉन्क्स कारचे चाहते या लाँचिगची अतुरतेने वाट पाहत आहे. या दोन्ही कार कधी लाँच केल्या जातील याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (Maruti Suzuki Jimny and Fronx )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मारुतीच्या जिम्नी आणि फ्रॉन्क्स नेक्सा या अधिकृत डिलरशीपकडे पोहोचल्या आहेत. त्यामुळे लवकरच कंपनी या कार लॉन्च करुन बुकींगला सुरुवात करेल हे स्पष्ट झाले आहे. (Maruti Suzuki Jimny and Fronx)

कधी होणार लॉन्चिग

कंपनीने या जिम्नी आणि फ्रॉन्क्स या नव्या एसयुव्ही कारच्या लॉन्चिंगबाबत अद्याप कोणतीही तारीख नियोजित केल्याची माहिती दिलेली नाही. पण असा अंदाज आहे की, एप्रिलमध्ये (२०२३) या कार लॉन्च केल्या जाऊ शकतात. जानेवारी झालेल्या ऑटो एक्स्पो प्रदर्शनात या दोन्ही एसयुव्ही कारची पहिली झलक पहायला मिळाली होती.

बुकिंग सुरु

जानेवारी २०२३ पार पडलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुतीने दोन्ही एसयुव्ही कार पहायला मिळाल्या. अल्पावधीतच या दोन्ही कारचे बुकींग मोठ्या प्रमाणात झाले. कंपनीच्या वेबसाईट आणि डिलरमार्फत बुकिंग करण्याची सुविधा आहे.

जाणून घ्या जिमनी कारबद्दल

मारुती सुझुकी जिम्नीचे आकर्षक असे डिझाईन आहे. थ्री लिंक रिजिड एक्सल सस्पेंशन आणि Low Range Transfer Gear सह ऑल ग्रिप प्रो फोर व्हिल ड्राईव्ह अशा फिचर्सनी सुसज्ज असणार आहे.

ट्रेकिंग करिता ही कार विशेष असणार आहे. मारुती जिम्नीची पॉवर क्षमते बाबत पहायचे झाले तर, ही कार १.५ लीटर इंजिनने सुसज्ज असणार आहे. यामध्ये आयडल स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी फिचर्स असणार आहे. तसेच इंजिन 104.8 ps इतक्या पॉवर सह 134.2 Nm इतका टॉर्क जनरेट करणार आहे. त्याचबरोबर फाइव्ह स्पीड मॅन्युअलसह फोर स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स अशा तांत्रिक बाबी असणार आहेत. सेफ्टीसाठी या एसयुव्ही कारमध्ये सहा एअरबॅग, ब्रेक-लिमिटेड स्लिप डिफरेंशियल, हिल होल्ड असिस्टसह ईएसपी, हिस डिसेंट कंट्रोल, रिअर व्ह्यू कॅमेरा अशा फिचर्सनी सुसज्ज कार असेल.

जाणून घ्या फ्रँक्स कारबद्दल

कंपनीची फ्रँक्स एकूण पाच प्रकारांमध्ये पहायला मिळेल. याचे बेसिक व्हेरिएंट सिग्मा आहे. त्यानंतर डेल्टा, डेल्टा प्लस, झेटा आणि अल्फा व्हेरियंट हे टॉप व्हेरियंट असणार आहेत. यापैकी, डेल्टा आणि सिग्मा प्रकार हे 1.2-लीटर पेट्रोल इंजिनसह ऑफर केल्या जाणार आहेत. उर्वरित तीन प्रकारांमध्ये, कंपनी 1.0-लीटर टर्बो इंजिन ऑफर करते.

1.2 लीटर व्हेरिअंटमध्ये एसयूव्ही 89.73 Ps पॉवर आणि 113 Nm इतका टॉर्क निर्माण करते. या कारमध्ये फाइव्ह-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक अशा तांत्रिक बाबी पहायला मिळतील. 1.0 लीटर व्हेरिअंटमध्ये टर्बो इंजिनमधून 147.6 Nm टॉर्कसह 100.06 PS इतकी पॉवर मिळते. त्याचबरोबर हे एक 5-गिअर मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-गियर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ऑफर केले जाते. यासह अनेक फिचर्सनी सुसज्ज अशी हि कार असणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news