Stock Market | बाजाराची संभ्रमित स्थिती, कोणते घटक कारणीभूत?

Stock Market | बाजाराची संभ्रमित स्थिती, कोणते घटक कारणीभूत?

खाली जाण्यासाठी कारण नाही आणि वर उसळी मारण्यास निमित्त नाही, अशा दोलायमान अवस्थेत बाजार सध्या घुटमळतो आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स पाव टक्क्यांहूनही कमी गतसप्ताहात वाढले. बँक निफ्टी एक टक्का वाढला. अशा संभ्रमित मनःस्थितीने शुक्रवारी कच खाल्ली आणि बाजार एक टक्क्यापेक्षा अधिक कोसळला. फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर कपातीला होणारा विलंब आणि इराण-इस्रायल यांच्यात नव्याने निर्माण झालेल्या संघर्षाची परिणीती क्रुड ऑईलचे दर वाढण्यात होण्याची शक्यता, या दोन गोष्टींनी मंदीवाल्यांना बळ पुरविले.

अमेरिका, चीन आणि जर्मनी या जगातील तीन प्रमुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये औद्योगिक उत्पादन वाढीस लागले आणि त्यामुळे मेटल्सना मागणी वाढू लागली. इतकी की, Nifty metal Index गेल्या एक महिन्यांत 17 टक्के वाढला. सध्या metal Index चा भाव 8951.30 आहे. 9054.95 हा त्याचा सार्वकालिक उच्चांक आहे. मेटल्समधील ही तेजी खालील कंपन्यांच्या शेअर्समध्ये दिसून आली.
वर उल्लेखलेल्या देशांमधील औद्योगिक उत्पादन जसे वाढेल, तसे मेटल्स शेअर्सना मागणी येईल. बर्‍याच FIIS नी वेदांतामधील आपली गुंतवणूक वाढवली आहे.

भारतीय शेअर बाजाराच्या इतिहासातील एक अत्यंत देदीप्यमान घटना या आठवड्यात घडून आली आणि ती म्हणजे आघाडीच्या 30 कंपन्यांचा समावेश असलेल्या Sensex या BSE च्या निर्देशांकाने 75000 चा टप्पा पार केला. (75124.28) BSE च्या सर्व एकत्रित नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण भाग भांडवले (Market Capitalization) रु. 400 लाख कोटींच्या पुढे गेले. गेल्या अवघ्या या नऊ महिन्यात रु. 100 लाख कोटींची वाढ भारतीय बाजाराने नोंदवली आहे. शेअर्सच्या वाढलेल्या किमती गतवर्षात IPO ची वाढलेली संख्या, FIIS नी वाढवलेली (गुंतवणूक आणि सर्वसामान्य) गुंतवणूकदारांचा वाढता सहभाग या गोष्टी याला कारणीभूत आहेत.

IT(Confederution of Indian Industry) ही भारतातील खासगी, सरकारी, मल्टिनॅशनल उद्योग कंपन्यांची मिळून बनलेली एक संस्था आहे. TVS Supply Chain Solutions चे चेअरमन आर. दिनेश हे तिचे अध्यक्ष आहेत. भारताचा CDP विकासदर येणार्‍या वर्षांमध्ये 8 ते 9 टक्के राहील आणि 2029 नंतर तो दुहेरी आकड्यांमध्ये असेल, असा विश्वास त्यांनी अलीकडेच व्यक्त केला. पायाभूत विकासावर सरकारचा खर्च वाढेल. शिवाय खासगी गुंतवणूक ही वाढेल, असे त्यांनी मत व्यक्त केले.

TCS ने आपले चौथ्या तिमाहीचे आणि पर्यायाने वार्षिक आर्थिक निकाल शुक्रवारी जाहीर केले. बाजाराच्या अंदाजांपेक्षा ते थोडे अधिक चांगले आहेत. निव्वळ नफ्यात 9 टक्के वाढ होऊन तो 12434 कोटी झाला.
उत्पन्नात 3.5 टक्के वाढ होऊन ते 61237 कोटी झाले.

गेले काही महिने आपण पाहिले तर एकाचवेळी निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये वाढ, सोने-चांदी भाषात वाढ, डॉलरच्या भावात वाढ आणि बिटकॉईनच्या भावात वाढ या गोष्टी आपण अनुभवत आहोत. सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम रु. 1 लाख होईल. त्याच्यापूर्वी 1 किलो चांदीचा भाव रु. 1 लाखावर जाईल, अशी वदंता बाजारात आहे.

आता शेवटी एका ETF-Exchange Traded Fund विषयी अमेरिकन बाजारात एक इंडेक्स आहे. त्याचे नाव NYSE FANGT Index. अमेरिकन बाजारात प्रचंड उलाढालीने ट्रेडिंग होणार्‍या 10 टक्के कंपन्यांचा मिळून हा इंडेक्स बनलेला आहे. त्या दहा कंपन्या खालीलप्रमाणे –

Meta, Apple, Amazan, Netflix, Microsoft, Google, Tesla, Nvidia, Snowflake, Broadcom. हा इंडेक्स प्रमाण मानून मिराई अ‍ॅसेटने 6 मे 2021 रोजी एक एढऋ बाजारात आणला. Mirae Asset NYSE FANGt ETF सिद्धार्थ श्रीवास्तव त्याचे फंड मॅनेजर आहेत. मागील एका वर्षात या फंडाने 101.57 टक्के परतावा दिला आहे. या फंडात गुंतवणूक करण्याची अथवा न करण्याची आमची कोणतीही शिफारस या लेखाद्वारे नाही. गुंतवणूकदारांनी सर्व उपलब्ध स्रोतांची माहिती करून घेण्यासाठी म्हणून हा उल्लेख.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news