Reshma Shinde : ‘माझा रुबाब हाय अनमोल; मी हाय नाखवाची पोर?’…

Reshma Shinde
Reshma Shinde
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'रंग माझा वेगळा' ही मालिकेने अल्पावधीतच चाहत्यांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील दीपा या पात्राला चाहत्यांची विशेष पसंती मिळाली. दिपाच्या प्रेमळ, निस्वार्थी आणि माणूसकीच्या स्वभावाने आपसुक चाहत्यांना आपलंस करून टाकलं. या मालिकेतील दीपाची भूमिका मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ने साकारली आहे. यासोबत ती सोशल मीडियावर फोटो शेअर करून चाहत्याच्या सपंर्कात राहत असते. आता तिचा आणखी एकदा मराठमोळा लूक समोर आला आहे

मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ने तिच्या इन्स्टाग्रामवर एक मराठमोळा (पारंपारिक) लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात ती गुलाबी- सोनेरी कलरच्या नऊवारी साडीत एकदम हटके दिसत आहे. यासोबत तिने डिझाईन असलेले गोल्डन रंगाच्या ब्लॉऊजने चारचॉद लावले आहेत. केसाचा अंबाडा, केसांत फुले, गळ्यात नेकलेस आणि कोल्हापुरी हार, हातात सोनेरी बांगड्या, कानात मॅचिग झुमके, लिपस्टिक आणि मेकअपने तिने तिची लूक पुर्ण केला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'माझा रुबाब हाय अनमोल, मी हाय नाखवाची पोर?.' असे लिहिले आहे. रेश्माने खास करून या फोटो एका जुन्या घराच्या समोर क्लिक केला आहे. कारण तिच्या मागे मातीचे जुने घर दिसतेय. तर रेश्माने फोटोला पोझ देताना तिने स्वत: च्या केसांतील फुलांना हळूवार स्पर्श केला आहे. रेश्मावर गुलाबी रंग उठून दिसतोय. हा तिचा फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरला आहे.

रेश्मा शिंदेचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी तिचे भरभरून कौतुक करताना अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने 'Oh my my ??', 'Ahaann ?❤️', 'Lookin good Resh! ❤️', 'Khup chan ❤️', 'लाखवाची पोरी ??', 'आग बाई किती छान ?', 'Beautiful ❤️❤️', 'Khup khup khup sundar distay', 'Kdk ???❤️', 'Prettyyyy❤️??', 'Nice ??', 'कोळी rocks.. Nice line and nice looking', 'Khup chan sari deepa …. Khup God disat aahes tujhi sadi eak number ????', 'Wow❤️', 'Agayyyaaaaa…???', 'Marathi girl ?', 'सुंदर ❤️', 'Cuteness', 'व्हय व्हय….. तू आहेस नखऱ्याची नार?', यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यत जवळपास १३ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. यासोबत रेश्माचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news