सांगली – इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात बंद

बंदमुळे इस्लामुपरात प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट होता.
बंदमुळे इस्लामुपरात प्रमुख बाजारपेठांत शुकशुकाट होता.
Published on
Updated on

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा – जालना येथे मराठी समाजाच्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा निषेध व मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला इस्लामपूर शहरासह वाळवा तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व व्यव्हार बंद ठेवून गावागावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

सकल मराठा समाजाच्यावतीने केलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यवसायिकांनी सर्व व्यव्हार दिवसभर बंद ठेवले होते. काही गावातून निषेध फेरी काढण्यात आली. इस्लामपूर शहरासह आष्टा, वाळवा, बोरगाव, ताकारी, भवानीनगर, बहे, कासेगाव, पेठ, नेर्ले, रेठरे धरण, कामेरी, कुरळप, येलूर, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रूक , तांदुळवाडी, कोरेगाव, शिगाव, बागणी, बावची, गोटखिंडी आदी गावातून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news