Maratha Reservation : ‘शाहूवाडी’त तीन दिवसांत ३ हजार ६६२ कुणबीच्या नोंदी सापडल्या

शाहूवाडी
शाहूवाडी
Published on
Updated on

विशाळगड

शाहूवाडी तहसील कार्यालयाकडून कुणबीच्या जुन्या नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून सहा सर्कल विभागासह तीन तज्ज्ञ मोडीवाचकांच्या साहाय्याने हे काम सुरु आहे. (Maratha Reservation) मंगळवार दि. ७ पासून ही मोहीम सुरू असून तालुक्यात आजअखेर ३ हजार ६६२ नोंदी सापडल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली. (Maratha Reservation)

मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकार आता वेगाने कामाला लागलं आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरीय कुणबी नोंदी शोधमोहीम सुरू करण्यात आली असून शाहूवाडी तालुक्यात देखील मंगळवारपासून ही सुरू करण्यात आली आहे.

पहिल्या दिवशी १०४, दुसऱ्या दिवशी ४९५ तर तिसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. ९) रोजी ३ हजार ६३ कुणबीच्या नोंदी आढळल्या. यावेळी तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी योग्य नियोजन करुन सदर नोंदी शोधताना योग्य काळजी व खबरदारी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. मोडी तज्ज्ञ प्रा. वसंत सिंघण, अमर पाटील, श्रीधर पाटील यांनी मोडीतील नोंदी शोधण्यासाठी सहकार्य केले.

यावेळी निवासी तहसीलदार गणेश लवे, महसुल नायब तहसिलदार रवींद्र मोरे उपस्थित होते. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कुणबी नोंदीला प्राधान्य देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहे. दरम्यान, जेवढ्या जास्तीत-जास्त नोंदी मिळणार आहेत, तेवढ्या प्रमाणात कुणबी दाखले देण्यास मदत होणार आहे. ही मोहीम सरकारची पुढील सूचना येईपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत तालुका पातळीवर विविध विभागांतर्गत कुणबी नोंदीचा शोध घेतला जात आहे.

शाहूवाडी येथील तहसील कार्यालयात मोडीतील कुणबी नोंदी शोधताना कर्मचारी, सोबत तहसीलदार रामलिंग चव्हाण व इतर.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news