Maratha Aarakshan | १४ फेब्रुवारी महाराष्ट्र बंद.. मनमाडमध्ये शुकशुकाट

मनमाड : मनमाड शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आल्योन रस्त्यावर असा शुकशुकाट दिसून येत आहे. (छाया : रईस शेख, मनमाड)
मनमाड : मनमाड शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आल्योन रस्त्यावर असा शुकशुकाट दिसून येत आहे. (छाया : रईस शेख, मनमाड)

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी काढण्यात राज्य शासनाने तर्फे काढण्यात आलेल्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे. या मागणी सोबत मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे बुधवार, दि.14 आजपासून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मनमाड शहरापासून उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण शहर शंभर टक्के कडकडीत बंद ठेवण्यात मनमाडकरांनी पाठींबा दिल्याचे दिसून येत आहे. शहरातील सर्वच रस्त्यावर शुकशुकाट पसरला असून महाराष्ट्र बंद मधून मेडिकल, हॉस्पिटल यासह इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news