नॉर्वेमध्ये ‘सोन्याच्या’ अनेक प्रतिमांचा शोध

नॉर्वेमध्ये ‘सोन्याच्या’ अनेक प्रतिमांचा शोध
Published on
Updated on

ओस्लो : नॉर्वेमध्ये पुरातत्त्व संशोधकांनी 1400 वर्षांपूर्वीच्या एका मंदिराच्या ठिकाणी केलेल्या उत्खननात 'नॉर्स' देवतेच्या छोट्या छोट्या सुवर्ण प्रतिमांचा शोध घेतला आहे. या प्रतिमा चौकोनी असून, त्या कागदासारख्या पातळ आहेत. या तुकड्यांवर नॉर्स देवता फ्रोय आणि देवी गर्ड यांची प्रतिमा कोरलेली आहे. या प्रतिमा 'मेरोविंगियन' काळातील असून, हा काळ इसवी सन 550 मध्ये सुरू होऊन 'वायकिंग युगा'पर्यंत अस्तित्वात होता. या प्रतिमांचा वापर बळी देण्याच्या विधीत झालेला असावा, असे मानले जात आहे.

ओस्लो विद्यापीठातील संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. विंग्रोम येथे होव्ह फार्मच्या जवळील रस्त्याकडेला हे उत्खनन करण्यात आले. त्यावेळी असे एकूण 35 सोन्याचे तुकडे सापडले. या तुकड्यांमध्ये छेद नाही. त्यामुळे त्यांचा वापर दागिन्यांसारखा होत नसावा, असे संशोधकांना वाटते. अशा प्रकारची सोन्याची पहिली प्रतिमा इसवी सन 1725 मध्ये स्कँडिनेवियामध्ये शोधण्यात आली होती.

कालांतराने तिला 'गुलग्लबर' असे नाव देण्यात आले. त्याचा अर्थ 'सोनेरी वृद्ध मनुष्य' असा होतो. आता नॉर्वेमध्ये केलेल्या उत्खननाचे नेतृत्व पुरातत्त्व संशोधिका कॅथरीन स्टेन यांनी केले. हा एक अतिशय महत्त्वाचा शोध असल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रत्येक तुकडा अतिशय लहान आकाराचा, म्हणजे नखाइतका असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news