Cannes Film Festival : रेड कार्पेटवर मानुषी छिल्लर दिसणार वेगळ्या अवतारात

Manushi Chhillar
Manushi Chhillar

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड स्टार मानुषी छिल्लर यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे. रेड कार्पेटवर स्टार्स दिवाज "अधिक मजेदार" असणार आहेत. यंदा मानुषी अनेक कमालीच्या लूक्ससोबत या फेस्टिव्हलमध्ये दिसणार आहे. या बद्दल मानुषी म्हणते " मी एवढं खात्रीशीर सांगू शकते की काहीतरी प्रायोगिक नक्कीच असणार आहोत आणि गेल्या वर्षीच्या ग्लॅमर लुकपेक्षा यावर्षीचे लूक्स पूर्णपणे वेगळे असणार आहोत.

यावर्षी मला एंजल लुक्स या थीमवर काम करायचे आहे, जे कमालीचं सुंदर आहे. "मिस वर्ल्ड बनलेल्या अभिनेत्रीने सांगितले की, ती महोत्सवाच्या ७७ व्या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी "उत्साहित" आहे. ती पुढे म्हणाली की, अशा जागतिक कार्यक्रमाचा भाग बनणे "नेहमी मजेदार" असते.

मानुषी शेवटी 'बडे मियाँ छोटे मियाँ' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिला 'कॅप्टन मीशा' म्हणून तिच्या अभिनयासाठी प्रशंसा मिळाली होती. अभिनेत्री आता 'तेहरान'च्या रिलीजची वाट पाहत आहे, ज्यामध्ये ती जॉन अब्राहमसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news