Maratha Reservation : जरांगेंच्या २ सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; संतप्त आंदोलकांनी बस पेटवली

Maratha Reservation : जरांगेंच्या २ सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; संतप्त आंदोलकांनी बस पेटवली

पुढारी ऑनलाईन डेस्क : मनोज जरांगे पाटील यांच्या २ सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. शैलेंद्र पवार आणि बाळासाहेब इंगळे, असं ताब्यात घेतलेल्या आंदोलकांची नावं आहेत. पहाटे चार वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी जालन्याच्या अंबड तालुक्यातील तीर्थपूर येथे बस पेटवली.

या घटनेनंतर अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. "मराठ्यांनी शांत रहा, आंतरवालीत बैठक घेऊ, त्यानंतर भूमिका स्पष्ट करू, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. शांततेत मराठा आंदोलकांनी धरणे आंदोलन करावे. अंबडमध्ये संचारबंदीची काय गरज आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दल नाराजीची लाट आहे. आपला एकहीप माणूस अडचणीत येऊ नये. पोलिस काय म्हणतात ते समजून घेतो. पोलिसांना त्रास देऊ नका," असेही जरांगे पाटील यांनी आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news