Manoj Jarange-Patil : मनोज जरांगे- पाटलांचा संघर्ष पडद्यावर चितारणार; चित्रपटाचे पोस्टर लाँच

मनोज जरांगे-पाटील
मनोज जरांगे-पाटील
Published on
Updated on

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांनी मराठा समाजासाठी केलेल्या संघर्षावर मराठी चित्रपट तयार केला जाणार आहे. चित्रपटाच्या टीमने आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांच्या हस्ते आज (दि.१२) पोस्टर लॉन्च केले. दोन महिन्यात या चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा चित्रपट निर्माते गोवर्धन दोलतोडे यांनी यावेळी केली. (Manoj Jarange – Patil)

या चित्रपटामध्ये मनोज जरांगे यांचा जीवनप्रवास, मराठा आंदोलनात त्यांची भूमिका आणि आता सध्या त्यांचे सुरु असलेले उपोषण हे चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या जीवनावर चित्रपट येणार आहे. 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील' असे या चित्रपटाचे नाव असणार आहे. यासाठी खळग चित्रपटाची टीम मनोज जरांगे यांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका राहुल पाटील करणार आहे. तर चित्रपटात जरांगे- पाटील यांनी ही काम करावे, अशी विनंती निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केली. परंतु, ती मनोज जरांगे यांनी नाकारली.

अंबड तालुक्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणास आज पंधरा दिवस झाले. शनिवारी रात्री पासून जरांगे यांनी औषधं, पाणी, आणि सलाईन घेणे लांबच परंतु नियमीत होणाऱ्या तपासणीसही नकार दिला. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले कि, आजपर्यंत मी सरकारचे ऐकले. शब्दाला जागलो. मात्र सरकार शब्दाला जागत नाही. आम्ही जी मागणी केली ती पूर्ण होत नाही. मराठा समाजाला सरसकट आरक्षण देत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार. सरकारने हवे तेवढा वेळ घ्यावा मी उपोषणावर ठाम असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

अंतरवाली सराटीत मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण तेराव्या दिवशीही सुरूच आहे. त्यांना भेटीला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

या चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात ही अंतरवाली सराटी गावातून केली जाणार असून मराठा समाजासाठी जरांगे यांनी केलेला वास्तविक संघर्ष या चित्रपटातून दाखवला जाणार आहे.

– गोवर्धन दोलताडे, चित्रपट निर्माते

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news