पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कर्नाल विधानसभा मतदारसंघातूनही आपण राजीनामा देत असल्याची घोषणा आज (दि.१३ मार्च) विधानसभेत केली.
खट्टर म्हणाले की, "मी आज जाहीर करतो की मी कर्नाल विधानसभेच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे.आजपासून आमचे नायब सिंग सैनी कर्नाल विधानसभेची जबाबदारी स्वीकारतील. यापुढे माझ्यावर दिली जाणारी जबाबदारी मी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिन."
लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपावरुन मंगळवारी (दि.१२मार्च) हरियाणातील भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्ष युती अखेर तुटली. मुख्यमंत्रीपदाचा मनोहर लाल खट्टर यांनी राजीनामा दिला . यानंतर नायबसिंग सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सैनी यांच्यासह भाजप नेते कंवर पाल गुजर, भाजप नेते मूलचंद शर्मा, जय प्रकाश दलाल, बनवारी लाल यांच्यासह अपक्ष आमदार रणजित सिंह यांनीही हरियाणाच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
कर्नाल लोकसभा मतदारसंघातून भाजप खट्टर यांना उमेदवारी देऊ शकते, अशी चर्चा हरियाणाच्या राजकीय वर्तुळात होत आहे.
हेही वाचा :