Mann ki Baat : आणीबाणी देशाच्या इतिहासातील काळा अध्याय; मन की बातमधून PM मोदींचा काँग्रेसवर हल्ला

Mann ki Baat
Mann ki Baat
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Mann ki Baat च्या माध्यमातून आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 25 जूनला काळा दिवस म्हटले आहे कारण याच दिवशी देशात आणीबाणी लादण्यात आली होती. मोदी म्हणाले की, आणीबाणीच्या काळात ज्या पद्धतीने लोकशाहीसाठी झटणाऱ्या लोकांवर त्याकाळच्या सरकारकडून अत्याचार करण्यात आला त्याला कधीही विसरता येणार नाही. तो देशाच्या स्वातंत्र्य काळातील एक काळा अध्याय आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला.

पंतप्रधान पुढे म्हणाले, भारत लोकशाहीची जननी आहे. आमच्यासाठी संविधान, लोकशाहीची मूल्ये हे सर्वतोपरी आहेत. त्यामुळेच 25 जूनला विसरू शकत नाही. कारण यादिवशी आणीबाणी लादण्यात आली होती. याकाळात अनेक लोकशाहीसाठी झटणाऱ्यांना क्रूरतम वागणूक दिली. त्याकाळातील सरकारने या काळात अनेकांवर वेगवेगळ्या प्रकारे अत्याचार केले. त्यांना अनेक प्रकारच्या यातना दिल्या. आजच्या युवापिढीला आणीबाणीचा काळ समजावा यासाठी त्यांनी आणीबाणीवर लिहिल्या गेलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांचा उल्लेख केला.

Mann ki Baat : आणीबाणीच्या काळाचे अवलोकन करण्याचे आवाहन

तसेच त्यांनी या काळात त्यांनी स्वतः कशा प्रकारे संघर्ष केला. याविषयीही सांगितले. ते म्हणाले त्यांनी त्या काळात संघर्ष में गुजरात या नावाचे पुस्तक लिहिले होते. तसेच आणीबाणीवर लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांचा त्यांनी यावेळी उल्लेख केला. मात्र, नुकत्याच लिहिल्या गेलेल्या 'टॉर्चर ऑफ पॉलिटिकल प्रिझनर्स' पुस्तकाचा विशेष उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याचा आज आपण अमृतकाल साजरा करत आहोत. यावेळी आपण देशाच्या स्वातंत्र्याला धोक्यात आणणाऱ्या आणीबाणीचा निश्चितच अवलोकन करायला हवे असे आवाहन देखील मोदी यांनी केले, जेणेकरून युवा पिढीला लोकशाहीचे महत्व समजण्यासाठी सोपे जाईल, असे ते म्हणाले.

योग करण्याचा सल्ला

याशिवाय आजच्या मन की बातमध्ये मोदी यांनी लोकांना स्वस्थ राहण्यासाठी योग करण्याचा सल्ला दिला. येत्या 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस येत आहे. त्यासाठी त्यांनी लोकांना शुभेच्चा दिल्या. याशिवाय त्यांनी मन की बातमध्ये अनेक खेळात यश मिळवणाऱ्या दिव्यांगांचे कौतुक केले. याशिवाय कला, संस्कृती आदी विषयांवर देखील उल्लेख केला.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news