Manjari Fadnis : मंजिरी फडणीसची मिया बिवी और मर्डरची मिस्ट्री

मंजिरी फडणीसची मिया बिवी और मर्डरची मिस्ट्री
manjari fadnis
manjari fadnis manjari fadnis
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मंजिरी फडणीस या मराठी अभिनेत्रीने (Manjari Fadnis) आजवर मराठी चित्रपटांसह बॉलिवtडमध्येही आपला ठसा उमटवलेला आहे. नुकत्याच आलेल्या 'अदृश्य' या रहस्यपटातील मंजिरीच्या भूमिकेचे बरेच कौतुक होत आहे. प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असलेल्या नायिकेची भूमिका यात मंजिरीने ताकदीने निभावली होती. (Manjari Fadnis)

सध्या मंजिरी चर्चेत आहे ते तिच्या एका खास वेब सिरीजमुळे. ही सिरीज एमएक्स प्लेअरवर एक्सक्लुजिव रुपात पाहता येणार आहे. 'मिया 'बीवी और मर्डर' ही सीरीज असून यात रहस्य, रोमांच असा मसाला पुरेपूर भरलेला आहे. १ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या तिच्या या सीरिजची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत.

यात मंजिरी फडणीससह राजीव खंडेलवाल हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे. राजीव यात एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मंजिरी पत्नीची भूमिका निभावत असून तिच्या व्यक्तीरेखेचे नाव आहे प्रिया. मंजिरीने याविषयी नुकतीच स्वदेशी सोशल मीडिया मंच कू वर खास पोस्ट केली आहे.

'मिया बीवी और मर्डर'चे ट्रेलर नुकतेच आले असून यात अत्यंत उत्कंठावर्धक पट उलगडताना दिसतो. पोलिस अधिकारी असलेल्या पतीचे अफेअर घरातल्या कामवाल्या बाईसोबत सुरू असते. तिकडे प्रिया अर्थात मंजिरीचेही अफेअर कुणासोबत तरी चालू असते. यातच कामवालीच सांगते की, ती आई होणार आहे. अचानकच तिचा खून होतो. दुसरीकडे प्रियाच्या बॉयफ्रेंडचीही एकाएकी हत्या होते. या दोन्ही हत्या लपवण्यासाठी अजून काही हत्या होतात. दोघे पती-पत्नी या संकटांचा सामना करत सहीसलामत बाहेर पडू शकतात का? हे पाहणे रंजक असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news