मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्‍यायालयीन कोठडीत २२ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ

( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )
( मनीष सिसोदिया संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली मद्य धाेरण घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्‍या न्यायालयीन कोठडीत आज २२ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्‍वेषण विभागाने (सीबीआय) सिसोदिया यांना २६ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. ( Manish Sisodia's judicial custody extended )

सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. तेव्‍हापासून ते कोठडीत आहेत. तिहार तुरुंगात चौकशी केल्यानंतर 'ईडी' ने ९ मार्च २०२३ रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सिसोदिया यांना अटक केली होती. सिसोदिया यांनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी दिल्ली मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता. दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर 2021 रोजी मद्य धाेरण लागू केले हाेते; परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या अखेर ते रद्द करण्‍यात आले हाेते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news