Manipur Women Sexually Assaulted : मणिपूर महिला अत्याचार व्हिडिओ; अटक केलेल्या आरोपीची पोलिसांकडून माहिती

Manipur Viral vido Culprit
Manipur Viral vido Culprit
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Manipur Women Sexually Assaulted : मणिपूरमध्ये उफाळलेल्या हिंसाचारादरम्यान दोन-तीन महिलांची जमावाकडून विवस्त्रकरून त्यांची धींड काढत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेच्या दोन महिन्यानंतर त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याचे तीव्र प्रतिसाद संपूर्ण देशात उमटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर आज सकाळी पोलिसांनी एका संशयित आरोपीची ओळख पटल्यानंतर त्याला अटक केली. आरोपीची माहिती पोलिसांनी उघड केली आहे.

एएनआयने ट्विटकरून याची माहिती दिली आहे. एएनआयच्या ट्विटमध्ये हुइरेम हेरोदास मेईतेई (३२ वर्षे) पेची अवांग लीकाई असे आरोपीचे नाव दिले आहे. सोबत त्याचा फोटोही जोडला आहे.

"मुख्य गुन्हेगार ज्याने हिरवा टी-शर्ट घातलेला होता आणि महिलेला धरून ठेवले होते, त्याला आज सकाळी योग्य ओळखीनंतर एका कारवाईत अटक करण्यात आली. त्याचे नाव हुइरेम हेरोदास मेईतेई (३२ वर्षे) पेची अवांग लीकाई"

दरम्यान, या घटनेचे संपूर्ण देशात तीव्र पडसाद उमटत आहे. समाजाच्या सर्वच स्तरातून याचा निषेध करण्यात येत आहे. तर नुकतेच द इंडियन एक्सप्रेसने या पीडित महिलेकडून प्रत्यक्ष घटनेची माहिती घेतली. यावेळी या पीडितेने धक्कादायक खुलासे करत पोलिसांनीच आम्हाला जमावात नेऊन सोडले, पोलिस स्वतःच त्या जमावासोबत सामिल होते, असे आरोप केले. 18 मे रोजी पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत आणि पीडितेने फोनवरून दिलेल्या माहितीत तफावत आढळून येत आहे.

दोषींना माफी नाही – पंतप्रधान

संसदेच्‍या अधिवेशन सुरु होण्‍यापूर्वी माध्‍यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की, मणिपूरमध्ये दोन्ही मुलींसोबत जे घडले ते अतिशय दुःखद आहे. मला या घटनेने खूप दु:ख झाले आहे. या प्रकरणातील दोषीला माफी मिळणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.

या व्हिडिओनंतर अक्षय कुमार, ऋचा चड्ढा, उर्फी जावेदसह अनेक स्टार्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही घटना निंदनीय आहे. दोषींना कडक शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

'मणिपूरमध्ये महिलांच्या विरोधात हिंसेचा व्हिडिओ पाहून अस्वस्थ झालोय. अपेक्षा करतो की, दोषींना इतकी कडक शिक्षा मिळाली की, कुणीही पुन्हा असे भयानक कृत्य करु नये.' असे अक्षयकुमारने म्हटले आहे.

'मणिपूरमध्ये जे झालं, ते केवळ मणिपूरसाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी लज्जास्पद आहे.' उर्फी जावेद

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news