Yohani : योहानी अजय देवगण सोबत बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री!

Yohani : योहानी अजय देवगण सोबत बॉलीवूडमध्ये करणार एन्ट्री!
Yohani : योहानी अजय देवगण सोबत बॉलीवूडमध्ये करणार एन्ट्री!
Published on
Updated on

श्रीलंकन गायिका योहानीचं ( Yohani ) 'मणिके मागे हिते' हे गाणं गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. या गाण्याचे इतरही अनेक भाषेत रिमेक करण्यात आले. सिंहिली भाषेतील या गाण्याने सोशल युझर्सला मोहिनी घातली आहे. अनेकांनी आपल्या मोबाईलची रिंगटोनही 'मणिके मागे हिते' हेच गाणे ठेवले आहे. हे गाणं जसं व्हायरल झालं तशी योहानीची प्रसिद्धी टॉपवर पोहचली. गूगलवर इंग्रजी अक्षर वाय (Y) जरी टाईप केलं तरी पहिल्यांदा योहानी असं नाव सर्चमध्ये येतं. आता याच योहानीबद्दल एक सर्वांच्या भुवया उंचावणारी बातमी समोर आली आली आहे.

पूर्वी योहानीची लोकप्रियता त्याच्या देशापुरती मर्यादित होती. पण जेव्हापासून तिचे गाणे व्हायरल झाले आहे, तेव्हापासून योहानीला जगभरात लोकप्रियता मिळाली आहे. या यशाच्या जोरावर योहानी आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ती अजय देवगणचा पुढील चित्रपट 'थँक गॉड' मध्ये झळकणार आहे.

इंद्रकुमार दिग्दर्शित या चित्रपटात योहानीचे सुपरहिट गाणे 'मणिके मागे हिते'चे हिंदी रिमेक चाहत्यांना ऐकायला मिळणार आहे. हे गाणे खुद्द योहानीच गाणार आहे. आता ही बातमी समोर येताच योहानीच्या सर्व चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळल्याचे चित्र आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. यात अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग दिसणार आहेत.

गाण्याचे शूटिंग लवकरच सुरू होईल..

या गाण्याचे हिंदी व्हर्जन तनिष्कने संगीतबद्ध केले आहे. तर रश्मी विरागने गाण्याचे बोल लिहिले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्रकुमार यांचे म्हणणे आहे की, या गाण्याचे शूटिंग लवकरच सुरू केले जाईल. चित्रपटाची संपूर्ण टीम मूळ सिंहली गाण्याच्या हिंदी व्हर्जनसाठी खूप उत्साहित आहे. दरम्यान, थँक गॉड हा एक विनोदी चित्रपट असेल. ज्यात एक विशेष संदेश देखील दिला जाईल. हा चित्रपट फक्त चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल, अशी माहिती भूषण कुमार यांनी दिली आहे.

निर्माता भूषण कुमार म्हणाले, प्रतिभावान संगीतकार-गायिका योहानीसोबत काम करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही भारतीय चाहत्यांसाठी मणिके मागे हिथेची पहिली देसी आवृत्ती आणत आहोत. थँक गॉड एक कौटुंबिक मनोरंजन करणारा आहे. आम्ही त्याच्या रिलीझची आतुरतेने वाट पाहत आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news