अंकुश चित्रपट : साजनभाईच्या भूमिकेतील मंगेश देसाईचा रावडी लूक

मंगेश देसाई
मंगेश देसाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणारा अभिनेता मंगेश देसाई अंकुश या चित्रपटात दमदार भूमिकेत दिसणार आहे. साजनभाई असं नाव असलेल्या या भूमिकेतील रावडी लूक लाँच करण्यात आला असून ओमकार फिल्म्स क्रिएशन्सच्या माध्यमातून राजाभाऊ घुले अंकुश या चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीमध्ये धडाकेबाज पदार्पण करत आहेत. "अंकुश" हा चित्रपट ६ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे.

"अंकुश" चित्रपटाचा थरारक टीजर नुकताच लाँच करण्यात आला. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटात केतकी माटेगावकर एका करारी भूमिकेत दिसणार आहे. तिच्यासह आता मंगेश देसाईच्या साजनभाई या भूमिकेचा रावडी लूक समोर आला आहे. मंगेश देसाईनं आजवर त्याच्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्या सशक्त अभिनयानं सजवली आहे. त्यामुळेच मराठीतील कसदार अभिनेत्यांमध्ये मंगेशचं नाव आवर्जून घेतलं जातं.

मल्टिस्टारकास्ट असलेल्या या चित्रपटातून अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेता मंगेश देसाई यांच्यामुळे अंकुश चित्रपटातील एकाहून एक सरस कलाकार आता समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे चित्रपटाविषयीचं कुतूहल दिवसेंदिवस वाढतंच आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news