पुणे: अखेर 21 महिन्यानंतर मंगलदास बांदल येणार तुरुंगाबाहेर, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

पुणे: अखेर 21 महिन्यानंतर मंगलदास बांदल येणार तुरुंगाबाहेर, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
Published on
Updated on

शिक्रापूर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी मागील २१ महिन्यांपासून कारागृहात असलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती व शिरूर तालुक्यातील राजकारणात उलथा पालथ घडवणारे पहिलवान मंगलदास बांदल यांना उच्च न्यायालयाने त्यांच्यावर दाखल असलेल्या शिक्रापूर येथील चार व पुण्यात दाखल असलेला एक अशा पाच गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील अटक असलेले सर्व बँक अधिकारी व सहआरोपी यांनाही जामीन मंजूर झाला आहे.

26 एप्रिल 2021 रोजी शिक्रापूर येथील सोसायटीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय मांढरे यांच्या तक्रारीवरून बांदल यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने गुन्हे घडल्याच्या आरोपावरून बांदलांसह त्यांचे काही जवळचे मित्र व काही बँक अधिकारी यांना अटक झाली होती. पुढील काळात अशाच पद्धतीचे बांदल यांच्याशी संबंधित तक्रारी दाखल झाल्या होत्या. एकुण पाच गुन्हे बांदल यांच्याशी संबंधित दाखल होते. या प्रकरणा संदर्भात बुधवारी( दि 18) महत्त्वपूर्ण सुनावणी उच्च न्यायालयात झाली. त्यात बांदल यांच्यासह त्यांच्या सर्व अटक असलेल्या सहकाऱ्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती अ‍ॅड. आदित्य सासवडे यांनी दिली. बांदल यांच्या वतीने उच्च न्यायालयात ज्येष्ठ वकील अशोक मुंदर्गी, अ‍ॅड. आबाद पोंडा,अ‍ॅड. अनिकेत उज्वल निकम ,अ‍ॅड. तपन थत्ते व अ‍ॅड. आदित्य सासवडे यांनी बाजू मांडली.

दरम्यान न्यायालयीन आदेश अद्याप वेबसाईटवर अपलोड झाला नसून अपलोड झाल्यानंतर सर्वांची नावे जाहीर होतील. जामिन प्रक्रियेला पुढील ४ ते ५ दिवस लागतील. नंतरच बांदल बाहेर येऊ शकणार असल्याची माहिती अ‍ॅड. अदित्य सासवडे यांनी दिली. दरम्यान बांदल यांचा जामीन मंजूर झाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news