दिपू- इंद्राची लगीनघाई ! या जोडीचे खास फोटो पहिले का ?

दिपू- इंद्राची लगीनघाई ! या जोडीचे खास फोटो पहिले का ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मन उडू उडू झालं' मालिका प्रेक्षकांची खास लाडकी आहे. या मालिकेत सध्या सुरू आहे ती लगीनघाई. प्रेक्षकांची लाडकी जोडी दिपू आणि इंद्रा आता फायनली लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी सज्ज झाली आहे.

अलीकडेच या जोडीचे हळदीचे फोटो व्हायरल झाले होते. आता या जोडीच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत. दीपू आणि इंद्राच्या नात्याला कडाडून विरोध करणाऱ्या देशपांडे सरांनी अखेर या लग्नाला परवानगी दिल्याने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

या जोडीच्या अलीकडेच व्हायरल झालेल्या हळदी लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता यांचे लग्नातले लुकही व्हायरल झाले आहेत. लाल ब्रोकेड साडीतील नवरी बनलेली दिपू खूपच खास दिसत होती. तर साऊथ इंडियन लूकमध्ये इंद्रा नेहमी प्रमाणेच हँडसम दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news