शिरूर न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार

शिरूर न्यायालयाच्या आवारात जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार

शिरूर: पुढारी वृत्तसेवा

शिरुर न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर घरगुती भांडणाच्या कारणावरुन पतीने पत्नी व सासूवर गोळीबार केला. त्यात पत्नी मंजुळा दिपक ढवळे (वय ३६) ठार झाली तर सासू तुलसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५६ दोन्ही रा वाडेगव्हाण , ता. पारनेर जि अहमदनगर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.

अनपेक्षित घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने भीतीचे वातावरण झाले होते. गोळीबार केलेल्या व्यक्तीला न्हावरा फाटा येथे पोलीसांनी पाठलाग करुन पकडले .या प्रकरणी आरोपी दीपक पांडुरंग ढवळे व संदीप पांडुरंग ढवळे( मुळ रा . ढवळगाव सध्या रां अंबरनाथ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे . हल्लेखोर हे रिक्षातुन आले होते .

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news