पुणे: वडगावात तरुणाची निर्घृण हत्या दोन जण जखमी; 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल

crime
crime

वडगाव मावळ : वडगाव येथील एका युवकाची रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास लोखंडी कोयता व तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली.

विश्वजित राजेंद्र देशमुख (वय 22, रा. संस्कृती सोसायटी वडगाव, ता. मावळ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी महेश काशिनाथ गायकवाड (वय 28, रा. वारंगवाडी) यांनी वडगाव मावळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील मातोश्री हॉस्पिटल जवळील बस स्टॉप समोर पूर्ववैमनस्यातून रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजल्याच्या सुमारास मोटार सायकलवर आलेल्या 10 ते 12 अनोळखी जणांनी लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत देशमुख यांच्या डोक्यात, पाठीवर वार करून त्यास ठार मारले.

तसेच सदरची भांडणे सोडविण्यास गेलेल्या महेश गायकवाड (रा. वारंगवाडी) व अभिषेक अनंता ढोरे (रा. वडगाव मावळ) यांच्यावर देखील त्यांनी कोयत्याने व तलवारीने वार केले. तसेच, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास भोसले हे करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news