दौंड: बसच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार जागीच ठार

दौंड: बसच्या धडकेत दुचाकीस्वार कामगार जागीच ठार
Published on
Updated on

कुरकुंभ : कुरकुंभ एमआयडीसीत कंपनीची बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात एक कामगार जागीच ठार झाला. अविनाश अशोक चव्हाण (वय २५, सध्या रा. झगडेवाडी, ता. दौंड, मुळ रा. नांदेड) असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. मंगळवार १९ जुलै रोजी दुपारच्या सुमारास कुरकुंभ एमआयडीसीतील इटर्निस कंपनीसमोर हा प्रकार घडला. अविनाश चव्हाण हा येथील मोडीप्रो कंपनीत कामाला होता. तो दुचाकीने जात असताना अल्काइल आमाईन्स कंपनीच्या कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसने चव्हाण याच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात चव्हाण याला गंभीर मार लागून तो घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news