पुणे: पोलिसांची नजर चुकवून पोलिस ठाण्यातच एकावर ब्लेडने वार

file photo
file photo
Published on
Updated on

राजगुरूनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: किरकोळ भांडण, वादावादी झाल्यावर त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला आलेल्या एकाने भांडण झालेल्या व्यक्तीवर ब्लेडने वार केले. पोलीस ठाण्यात पोलिसांची नजर चुकवुन झालेल्या या प्रकाराने खळबळ उडाली. या घटनेत जखमी झालेल्या क्षीतेज बाबाजी दांडगे (रा. दोंदे, ता. खेड) याला खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर वार करणारा वैभव गोविंद बोऱ्हाडे (रा. दोंदे, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

जखमी व आरोपी दोंदे गावात शेजारी राहायला आहेत. जखमी क्षितिजच्या घरासमोर वैभवची मुलगी गेली होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबात भांडणे होऊन त्यात जखमीने वैभवाच्या पत्नीला मारहाण केली होती. सोमवारी (दि. १३) घडलेल्या या भांडणाची मंगळवारी (दि. १४) सकाळी पोलिसांत तक्रार द्यायला वैभव आला. पोलिसांनी क्षितीज याला संपर्क साधून बोलवून घेतले. ठाण्यात एकत्र बसले असताना पोलिसांची नजर चुकवुन वैभव बोऱ्हाडे याने जवळ आणलेल्या धारदार ब्लेडने क्षितिज याच्या गळ्यावर वार केला. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला बाजुला केले. अन्यथा पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटना घडली असती. आरोपी वैभव हा शवविच्छेदन कर्मचारी असुन त्याच्याकडे धारधार ब्लेड होते, असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news