नितीश कुमारांचा ‘निवडणूक फॉर्म्यूला’ ममता बॅनर्जींना पसंत, विरोधकांना एकजुटीचे आवाहन

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी एकजुटीने लढावे. एका मतदारसंघात सर्वांनी मिळून भाजपविरोधात एकच उमेदवार द्यावा, असा 'निवडणूक फॉर्म्यूला' जेडीयूचे नेते व बिहारचे माजी मुख्‍यमंत्री नितीश कुमार ( Nitish Kumar ) यांनी नुकताच मांडला होता. याला तृणमूल काँग्रेसच्‍या अध्‍यक्षा आणि पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ) यांनीही पसंती दर्शवली आहे. ( Unite against BJP )

राष्‍ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. भाजपविरोधात विरोधी पक्षांच्‍या एकजुटीसाठी( Unite against BJP ) त्‍यांनी ममता बॅनर्जी यांची कोलकाता येथे जावून भेटली होती. त्यानंतर त्‍यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्‍याशीही चर्चा केली होती. यावेळी विरोधी पक्षांनी लोकसभा निवडणुकीत एका मतदारसंघात एकच उमेदवार द्यावा, असे नितीश कुमारांनी सूचवल्‍याचे सूत्रांनी म्‍हटले होते. या सूचनेचे ममता बॅनर्जी यांनी समर्थन केले आहे.

 स्वतःच्या बालेकिल्ल्यात भाजपविरोधात लढले पाहिजे…

विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणुकीत लोकसभेच्‍या सर्व ५४३ जागांवर समान उमेदवार उभे करून भाजपशी लढावे, असे ममता बॅनर्जी यांनी समशेरगंजमध्ये बोलताना सांगितले. ज्या भागात तुमची ताकद आहे तिथे लढा. प्रत्येक पक्षाने स्वतःच्या बालेकिल्ल्यात लढले पाहिजे, असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले. ( Unite against BJP )

भाजप ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास संस्‍थांचा गैरवापर करत आहे. भाजप नेते अधिकाऱ्यांना विरोधी पक्षांच्‍या नेत्‍यावर खोटे केसेस तयार करून बदनामी करण्यास सांगत आहेत, आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news