Malik Vs Wankhede : समीर वानखेडेंच्या विवाहासंदर्भात आणखी एक गौप्यस्फोट

Malik Vs Wankhede : समीर वानखेडेंचा 'तो' दाढीवाला मित्र कोण? 
Malik Vs Wankhede : समीर वानखेडेंचा 'तो' दाढीवाला मित्र कोण? 
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला दिवसेंदिवस वेगळं वळण लावलेले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे समीर वानखेडे (Malik Vs Wankhede) यांच्यातील वाद वाढत असून रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक हे वेगवेगळे गौप्यस्फोट करत आहेत. त्यांनी आज पुन्हा समीर वानखेडे यांच्या पहिल्या विवाहाबाबत गौप्यस्फोट केला आहे.

नवाब मलिक यांनी आज सकाळी दोन ट्विट केले. त्यात समीर वानखेडेंच्या (Malik Vs Wankhede) पहिल्या विवाहाबाबत अजून एक गौप्यस्फोट केला. ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले की, "समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह ७ डिसेंबर २००६ रोजी लोखंडवाला कॉम्प्लेक्स, अंधेरी येथे झाला होता. या निकाहामध्ये ३३ हजार रुपयांचा मेहेर देण्यात आला. तसेच समीर वानखेडेंची बहीण यास्मिन दाऊद वानखेडे हिचे पती अझीझ खान हे साक्षीदार क्रमांक २ होते", असा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत नवाब मलिकांनी त्यांना अडचणीत आणलं आहे.  यापूर्वी नवाब मलिक यांनी एनसीबीमधील एका अधिकाऱ्याचे निनावी पत्र शेअर करत समीर वानखेडे यांची कार्यपद्धती आणि त्यांनी केलेल्या २६ कारवायांवर प्रश्न उपस्थित केले. एनसीबीमधील एका अधिकाऱ्याने पाठवलेल्या निनावी पत्रामधील मजकूर मी ट्विटरवरून प्रसिद्ध केला आहे. एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे पत्र डीजी नार्कोटिक्स यांना पाठवणार आहे. आता समीर वानखेडेच्या चौकशीमध्ये हे पत्र समाविष्ट करण्याची विनंती मी केली आहे", असेही नवाब मलिक यांनी म्हंटलं होतं.

समीर वानखेडे यांनी तपास केलेल्या २६ खटल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतानाच वानखेडे यांच्या टीममधील काही अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीलोलूप अधिकारी आहेत. त्यांना माध्यमांमध्ये चर्चेत राहणे आवडते. समीर वानखेडे यांनी अनेक निर्दोष लोकांना बनावट एनडीपीएस केसमध्ये अडकवले आहे, असा दावा या पत्रातून करण्यात आला होता.

समीर वानखेडे यांनी तसेच बनावट केस उभ्या करण्यासाठी एक टीम उभी केली आहे. त्यामध्ये सुपरिटेंडेंट विश्वविजय सिंह, आयोएस आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी, जेआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी.डी. मोरे, विष्णू मीणा, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय अनिल माने आणि समीर वानखेडेंचा खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे, असा दावा त्यांनी केला.

पहा व्हिडीओ : वारसा सांगणार वास्तुवैभव…

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news