Malaika Arora : मलायकाने लपवले खरे वय? नेटिझन्सना समजल्यावर…

malaika arora
malaika arora

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने आपल्या फिटनेसमुळे आणि सौंदर्यामुळे नेहमीत आपले वय लपवत आलेली आहे. २३ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस साजरा झाला. (Malaika Arora ) मलायकाने आपला वाढदिवस देखील खास ठिकाणी खास अंदाजात साजरा केला. सोशल मीडियावर तिने खास पोस्ट देखील शेअर केली आहे. वाढदिवसाची पोस्ट शेअर करत मलायका ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. मलायकाने या पोस्टला कॅप्शन अशी काही लिहिली की, नेटिझन्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले. आणि तिचे खरे वय समजल्यानंतर ते निराशदेखील झाल्याचे समोर आले. (Malaika Arora )

संबंधित बातम्या –

मलायकाने स्वत:चे वय ४८ सांगितलं!

मलायका अरोराने वाढदिवसादिवशी काही निवडक फोटो शेअर केले. आणि त्यासोबत एक कॅप्शनदेखील लिहिलीय. कॅप्शनमध्ये मलायकाने स्वत:चे वय ४८ सांगितलं आहे. पण विकिपीडीयानुसार, मलायकाचा जन्म १९७३ मध्ये झाला होता. त्यामुळे तिचे वय ५० दाखवते. सोशल मीडियावर युजर्सनी कॉमेंट सेक्शन अभिनेत्रीला सल्लादेखील दिला.

'कुणाचीही दिशाभूल करू नका'

युजर्सनी मलायकाला सल्ला देत सांगितलं की, कमीत कमी वाढदिवसाला तरी कुणाचीही दिशाभूल करू नको. मलायका अरोराने पोस्ट शेअर करून लिहिलं की, 'आणखी एक वर्ष गेलं आणि मी ४८वर्षांची झाले. (माझ्या आवडत्या बार्थरोबमध्ये). मी शांती आणि आपल्या लोकांसाठी आभारी आहे, जे माझ्या या संपूर्ण प्रवासात माझ्यासोबत राहिले आहेत. येथे बसून प्रत्येक क्षणी खूप छान वाटत आहे…'

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news