राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पानसरे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Published on
Updated on

जेजुरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जमिनीच्या जुन्या वादातून जेजुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांची ७ जुलैला कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी घटनेनंतर पळून गेले होते. मध्यरात्री जेजुरी पोलिसांनी या आरोपींना दापोडी पुणे येथे ताब्यात घेतले.

जेजुरी धालेवाडी हद्दीतील जवळील एका शेतात जमिनीच्या जुन्या वादातून आरोपी वणेश परदेशी, काका परदेशी, किरण परदेशी, स्वामी परदेशी आणि इतर एका व्यक्तीने मेहबूब पानसरे यांच्यावर कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणातील आरोपी स्वामी परदेशी व किरण परदेशी यांना त्याच दिवशी जेजुरी पोलिसांनी ताब्यात घेतले होते.  दोन मुख्य आरोपी फरार झाले होते.

फरार झालेल्या दोघा मुख्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने दापोडी पुणे येथे पहाटे चार वाजता मुख्य आरोपी वनेश परदेशी व काका परदेशी यांना ताब्यात घेतले. या दोघा आरोपींना सासवड न्यायालयात दाखल केले असता आरोपींना 12 तारखे पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news