Mahua Moitra: अपात्रताविरुद्ध महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

Mahua Moitra: अपात्रताविरुद्ध महुआ मोईत्रा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  कॅश फॉर क्वेरी प्रकरणात खासदारकी गमावलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी लोकसभेच्या अपात्र ठरविण्याच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. लोकसभेच्या नैतिक आचरण समितीच्या शिफारशींच्या आधारे  महुआ मोईत्रांना अपात्र ठरविण्याचा निर्णय मागील आठवड्यात लोकसभेत झाला होता. Mahua Moitra

संबंधित बातम्या

महुआ मोईत्रा यांनी उद्योगपती हिरानंदानींकडून पैसे आणि भेटवस्तू घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप होता. या प्रकरणात भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर नैतिक आचरण समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. महुआ मोईत्रांचा पुर्वाश्रमीचा प्रियकर जय अनंत देहादराय याच्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे खासदार दुबे यांनी तक्रार केल होती. Mahua Moitra

तर उद्योगपती हिरानंदानी यांनीही या प्रकरणात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये महुआ मोईत्रांनी संसदेचा लॉगीन आयडी आणि पासवर्ड देखील आपल्याकडे सोपविल्याचे म्हटले होते. नैतिक आचरण समितीला महुआ मोईत्रांवरील आरोप खरे आढळले होते. एवढेच नव्हे तर बंगळुरू, दुबई, अमेरिका येथून महुआ मोईत्रांचे संसदेचे खाते वापरण्यात आल्याचेही आढळल्याच्या पार्श्वभूमीवर, हा संसदेच्या सुरक्षेशी निगडीत विषय असल्याने त्यांची खासदारकी रद्द करावी अशी शिफारस समितीने केली होती.

समितीचा अहवाल मागील शुक्रवारी (८ डिसेंबर) लोकसभेत आवाजी मतदानाने संमत करण्यात आला होता. खासदार महुआ मोईत्रा यांचे वर्तन अनैतिक आणि अशोभनीय होते, हा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते, असे सभापती ओम बिर्ला म्हणाले होते. या साऱ्या घटनाक्रमानंतर महुआ मोईत्रा यांनी अपात्रतेविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचे संकेत दिले होते. त्यापार्श्वभूमीवर आज त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आपल्याला अपात्र ठरविण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचे महुआ मोईत्रांनी याचिकेत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news