महिंद्रा अँड महिंद्रा पुण्यात उभारणार 10 हजार कोटींचा प्लांट, 5 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार

महिंद्रा अँड महिंद्रा पुण्यात उभारणार 10 हजार कोटींचा प्लांट, 5 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार
Published on
Updated on

पुणे: इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी पुण्यात एक कारखाना उभारणार असून त्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. महाराष्ट्र सरकारकडून औद्योगिक प्रोत्साहन योजनेंतर्गत याला मान्यताही मिळाली आहे. महिंद्रा पुण्यात इलेक्ट्रिक वाहन उत्पादक प्लांट उभारणार आहे. या प्लांटच्या निर्मितीसाठी 7 ते 8 वर्षांचा वेळ लागू शकतो. या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील होणार आहे.

आपल्या एकूण वाहनांच्या उत्पादनांमध्ये विद्युत वाहनांचा वाटा 2027 पर्यंत 30 टक्के असावा, असे उद्दिष्ट य़ा कंपनीने बाळगले असून त्या दृष्टीने इतर राज्यांमध्येदेखील कारखाने उभारण्याकरीता कंपनी अनेक राज्यांशी चर्चा करीत आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी महाराष्ट्र सरकारने औद्योगिक प्रोत्साहन योजना आखली आहे. त्या अंतर्गत पुण्यातील कारखाना सुरू केला जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले. महिंद्रा अँड महिंद्रातर्फे एका उपकंपनीच्या माध्यमातून या कारखान्यासाठी टप्प्याटप्प्याने 10 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. या ठिकाणी तिची आगामी बॉर्न इलेक्ट्रिक व्हेइकल (बीईव्ही) या श्रेणीची वाहने बनविण्यात येणार आहेत. या बीईव्हीचे प्रदर्शन कंपनीने गेल्या 15 ऑगस्ट रोजी इंग्लंडमधील ऑक्सफर्डशायर येथे केले होते. पुण्याच्या नवीन कारखान्या बनवलेली वाहने महिंद्राच्या इग्लो ईव्ही या प्लॅटफॉर्मवर आधारित असतील आणि त्यात एक्सयूव्ही ब्रँड अंतर्गत ई-एसयूव्हीचा समावेश असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news