पुढारी ऑनलाईन डेस्क : 'अल्ट्रा झकास' मराठी ओटीटीवर 'सर्व लाईन व्यस्त आहेत' या सुपरहिट चित्रपटाचा २३ ऑक्टोबर २०२३ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन 'प्रदीप मेस्त्री' यांनी केले असून चित्रपट सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, सौरभ गोखले, स्मिता शेवाळे आणि निथा शेट्टी यांच्या अभिनयाने चित्रपट उजळून आला आहे. तसेच पंकज पडघम आणि उद्भव ओझा यांनी चित्रपटाला संगीत दिले असून आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरांनी चित्रपटातील गाणी दुमदुमणार आहेत.
बाब्याच्या (सिद्धार्थ जाधव) लग्नात त्याची एक्स गर्लफ्रेंड प्रियंका (हेमांगी कवी) गोंधळ घालण्यासाठी येते. परंतु गडबडे बाबाच्या (महेश मांजरेकर) आशीर्वादाने समीर (सौरभ गोखले) बाब्याच्या मदतीला येऊन तिला अडवतो. परंतु त्याच वेळी प्रियांकाचा भाऊही (कमलाकर सातपुते) येतो आणि तिथे एक नवा तुफान विनोदी गोंधळ सुरू होतो. या गोंधळात बाब्याचं लग्न होतं की नाही ? या कोड्याचं उत्तर चित्रपटात मिळणार आहे.