नेवाळी : पुढारी वृत्तसेवा ; जमिनीच्या वादातून भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहर प्रमुख महेश गायकवाड ( Mahesh Gaikwad ) यांच्यावर पोलीस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये गायकवाड यांच्या शरीरामधून डॉक्टरांनी सहा गोळ्या काढल्या आहेत. गंभीर जखमी महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृतीत चांगली सुधारणा होत आहे. त्यामुळे त्यांची शुक्रवारी (16 फेब्रवारी) रुग्णालयातून सोडले जाणार असल्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या
उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनात महेश गायकवाड यांच्यावर 2 फेब्रुवारीला गोळीबार झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असताना शिवसैनिकांनी विविध कार्यक्रम हाती घेत त्यांच्यावर यशस्वी उपचारांसाठी प्रार्थना केल्या होत्या. तर खासदार डॉ.श्रीकांत शिंदे हे गायकवाड यांच्या उपचारांसाठी ज्यूपिटर रुग्णालयात ठाण मांडून होते. अखेर गायकवाड यांना शुक्रवारी रुग्णालयातून सुटका केली जाणार आहे.