Mahesh Babu : ‘… हा पान मसाल्याची जाहिरात करू शकतो’: नेटकऱ्यांनी महेश बाबूला सुनावले

mahesh babu
mahesh babu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

टॉलीवुड सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) 'बॉलीवूड' वर कमेंट करत मी बॉलिवूडला परवडणार नाही, असे म्हटले होते. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला खरे-खोटे सुनावत प्रचंड ट्रोल केले. आता सुपरस्टार महेश बाबूवर (Mahesh Babu) निराश ट्रोलर्सनी त्याच्या पान मसाला ब्रँडच्या प्रमोशनवरून निशाणा साधला आहे.

साऊथ चित्रपट स्टार महेश बाबू सध्या त्याचा रिलीज झालेला चित्रपट सरकारू वारी पाटाच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. तसेच बॉलिवूडवर ताशेरे ओढत महेश बाबू त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील चर्चेत आहे. महेश बाबूने सरकारू वारी पाटाच्या प्रमोशनवेळी बॉलिवूडवर एक वादग्रस्त वक्तव्य केले होतं.

ज्यानंतर यावर बराच गदारोळ झाला होता. महेश बाबू यांनी बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम न करण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्याच्या मुलाखतीत सांगितले होते की, 'बॉलीवूडला मी परवडणार नाही' असे मला वाटते.  हिंदी चित्रपटांमध्ये काम करून आपला वेळ वाया घालवायचा नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला होता. काही जणांनी त्याच्या वक्तव्याचे समर्थन केले होते.

महेश बाबू झाला चांगलाच ट्रोल

आता महेश बाबूच्या या विधानाने प्रेक्षकांचे मन दुखावले आहे. यानंतर लोकांनी त्याच्या पान मसाला ब्रँडच्या प्रचारासाठी अभिनेत्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर ट्विट करून लोकांनी महेश बाबूच्या पान मसाला ब्रँडच्या जाहिरातीवर त्याची शाळा घेतलीय. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, 'बॉलीवूडला माहीत नाही; पण पान मसाला ब्रँड कंपनी महेश बाबूला नक्कीच पुरस्कार देऊ शकतो.' दुसऱ्या सोशल मीडिया युजरने लिहिले की, 'मला वाटते की, महेश बाबूसारख्या स्टारला तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पान मसाला ब्रँडचा प्रचार करण्याची परवानगी आहे. पण इतर स्टार्सना असे केल्याने गैरवर्तन केले जाते. '

दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या चित्रपटातून महेश बाबूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. वास्तविक, बाहुबली फेम दिग्दर्शक एसएस राजामौली हे सध्या टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबूसोबत त्याच्या पुढच्या चित्रपटाच्या तयारीत बिझी आहेत. हा चित्रपट जंगल ॲडव्हेंचर बेस्ड ड्रामा चित्रपट असेल. महेश बाबूचा हा पहिलाच हिंदी चित्रपट ठरणार आहे. राजमौली यांचा हा चित्रपट आरआरआर आणि बाहुबली सीरिजप्रमाणे मेगा बजेट चित्रपट असेल की नाही हे लवकरच समजणार आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news