पुणे: वीजबिल भरून सहकार्य करा; महावितरणचे आवाहन, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

पुणे: वीजबिल भरून सहकार्य करा; महावितरणचे आवाहन, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे परिमंडलातील 5 लाख 11 हजार 614 घरगुती, कमर्शियल व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही 102 कोटी 26 लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. तसेच वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने मार्च महिन्यात आतापर्यंत 22 हजार 816 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे.

पुणे शहरात एकूण 2 लाख 15 हजार 454 वीजग्राहकांकडे 33 कोटी 34 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 88 हजार 295 ग्राहकांकडे 24 कोटी 87 लाख रुपये, कमर्शियल 25 हजार 468 ग्राहकांकडे 7 कोटी 52 लाख रुपये, औद्योगिक 1 हजार 691 ग्राहकांकडे 94 लाख 64 हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 27 दिवसांमध्ये पुणे शहरातील 16 हजार 80 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण 1 लाख 4 हजार 770 वीजग्राहकांकडे 24 कोटी 53 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 89 हजार 276 ग्राहकांकडे 13 कोटी 98 लाख रुपये, कमर्शियल 12 हजार 384 ग्राहकांकडे 5 कोटी 67 लाख रुपये, औद्योगिक 3 हजार 110 ग्राहकांकडे 4 कोटी 86 लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या 27 दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमधील 3 हजार 616 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण 1 लाख 91 हजार 390 वीजग्राहकांकडे 44 कोटी 39 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती 1 लाख 72 हजार 952 ग्राहकांकडे 31 कोटी 48 लाख रुपये, कमर्शियल 15 हजार 894 ग्राहकांकडे 8 कोटी 14 लाख रुपये, औद्योगिक 2 हजार 544 ग्राहकांकडे 4 कोटी 76 लाख रुपयांची थकबाकी आहे. तर या महिन्यांत आतापर्यंत 3 हजार 120 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news