महती नवदुर्गांची : श्री लक्ष्मीदेवी
महती नवदुर्गांची : श्री लक्ष्मीदेवी

महती नवदुर्गांची : श्री लक्ष्मीदेवी

नवदुर्गांतील नवमदुर्गादेवी म्हणजेच श्री लक्ष्मीदेवी होय. हत्तीमहाल, शाहू क्लॉथ मार्केट समोरील शासनाच्या वजनमापे कार्यालय परिसरात देवीचे मंदिर आहे. चतुर्भुज, शेंदूर महती लावलेली दोन फूट उंचीची बैठी मूर्ती मंदिरात लक्षवेधी आहे. मंदिराजवळील श्रीपादुका व महादेव देवीच्या परिवार देवता आहेत.

सर्व ऐहिक, पारलौकिक संपत्तीचे निर्भेळ सारगर्भस्वरूप, अखिल संपदा म्हणजेच 'श्री' व त्या गुणांची प्रेरणाशक्ती, त्या तत्त्वाचे दर्शन करविणारी जी मायाशक्ती तीच 'लक्ष्मी' या दोहोंचे अभिन्न, अखंड स्वरूप म्हणजेच ही देवी होय. जसे अर्धनारीनटेश्वर ही शिव-शक्तीची अखंडता आहे, तशीच ही देवता विष्णू शक्तीची अखंडता आहे. अशा दुर्मीळ तत्त्वाचे पूजन हे सर्वसुखभोग देणारे व मुक्ती देणारे आहे. येथे मूलतत्त्व शक्तीतच समाविष्ट आहे. त्यामुळे फक्त देवीस्वरूप दर्शनास मिळते. (संदर्भ : श्री नवदुर्गायात्रा मार्गदर्शन)

logo
Pudhari News
pudhari.news