महती नवदुर्गांची : श्री कमलजादेवी (श्री कमलांबिका)

श्री कमलजादेवी
श्री कमलजादेवी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाई होय. करवीर निवासिनीच्या सभोवताली असणाऱ्या विविध देव- देवतांमुळे या नगरीला एक वेगळी आध्यात्मिक बैठक प्राप्त झाली आहे. एकवीरा, मुक्तांबिका, पद्मावती, प्रियंगाई, कमलजा, महाकाली, अनुगामिनी, गजेंद्रलक्ष्मी, श्री लक्ष्मी आदी नवदुर्गांबरोबर त्र्यंबोली, उज्ज्वलांबा, कात्यायनी या तीन वरप्राप्त देवताही तितक्याच महत्त्वपूर्ण मानल्या जातात. देवांच्या रक्षणासाठी व दुष्ट राक्षसांचा संहार करण्यासाठी वेळोवेळी स्त्रीशक्तीने अवतार घेतले. या अवतारांमध्ये नवदुर्गांना विशेष महत्त्व आहे. विविध धार्मिक ग्रंथांत या नवदुर्गांचे उल्लेख आहेत. नवरात्रौत्सवानिमित्त या नवदुर्गांची माहिती जाणून घेऊया.

नवदुर्गातील पंचमदुर्गा देवी म्हणजेच श्री कमलजादेवी (श्री कमलांबिका) होय. शिवाजी पेठेतील म. गांधी मैदानाच्या पिछाडीस असणाऱ्या बावडेकर आखाड्याजवळील नृसिंह मंदिराजवळ कमलजादेवीचे मंदिर आहे मंदिरात कमळावर बसलेली चतुर्भुज, दोन फूट उंचीची नवदुर्गा महती प्रासादिक मूर्ती आहे. श्रीनृसिंह, विठ्ठल-रुक्मिणीदेव परिवार देवता आहेत.

भीमाशंकर क्षेत्रावर म हादेवांनी दुर्गासुराशी युद्ध सुरू केले. तेव्हा आपल्या योगिनीगणासह म हागौरी सिंहावर बसून युद्धास आली. तिने दुर्गासुराचा नाश केला म्हणून ब्रह्मदेवाने देवीची कमलपुष्पाने केव्हापासून ही गौरी 'कमलजी' नावाने प्रसिद्ध झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news