बालगुन्हेगारीत देशात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर

बालगुन्हेगारीत देशात महाराष्ट्र दुसर्‍या स्थानावर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात सर्वाधिक बालगुन्हेगार आहेत. तर बालगुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसर्‍या स्थानावर असणे राज्यासाठी चिंताजनक आहे.

1 जानेवारी 2022 ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत नागपूर शहरात 413 विविध गुन्ह्यांत 467 बालगुन्हेगारांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात खून, दरोडा, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, चोरी, दुखापत करणे, अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. या आकडेवारीवरून नागपूर शहरात रोज 1 गंभीर गुन्हा अल्पवयीन करत असल्याचे स्पष्ट होते. यामागे एखादे रॅकेट अथवा सराईत गँगस्टरचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे.

नागपूर हे राज्याच्या उपराजधानीचे ठिकाण असून, गेल्या काही वर्षांपासून नागपूर शहराची क्राईम सीटी म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली आहे. त्यात आता सर्वाधिक बालगुन्हेगारसुद्धा नागपूर शहरात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नागपूरची ओळख सर्वाधिक बालगुन्हेगार असलेले शहर अशी असणे निश्चितच भूषणावह नाही. त्यामुळे हे शहर आणि राज्य बालगुन्हेगारीमुक्त करण्यासाठी तातडीने उचित पावले उचलावीत, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news