MPSC : एमपीएससीकडून मेगा भरती, ८,१६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

MPSC : एमपीएससीकडून मेगा भरती, ८,१६९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. (MPSC) आयोगाच्या संकतेस्थळावर ही जाहिरात पहावयास मिळेल. एमपीएससीने एकूण ८ हजार १६९ पदांसाठी ही जाहिरीत काढली असून सहाय्यक कक्ष अधिकारी पदाची ७० पदे भरली जाणार आहेत. ट्विटरवर देखील यासंदर्भात अपडेट देण्यात आली आहे. (MPSC)

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि अनुभवावर आधारित सरळसेवा भरतीतील चाळणी परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. आता या परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार आहेत. एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. नगरविकास, विधी आणि न्याय, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य, सार्वजनिक आरोग्य या विभागातील पदांसाठी गेल्यावर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान जाहिरात प्रसिद्ध केली होती.

ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच ही परीक्षा 30 जानेवारीला घेण्याचे नियोजन एमपीएससीने केले होते. मात्र, प्रशासकीय कारणास्तव या परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. आता 8 फेब्रुवारीला वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. 26 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकातील अटी-शर्तींमध्ये बदल केला नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news