Maharashtra Politics : “महा” पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती; शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका

Maharashtra Politics : “महा” पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती; शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : आमदार पात्र-अपात्रतेच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल देताना, शिवसेना पक्ष हा बहुमताच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निकाल गुरुवारी (दि.११) दिला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने मंगळवारी (दि.११)  महापत्रकार परिषद घेतली. यानंतर आज (दि.) भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,"अशी "महा" पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती.जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!!" (Maharashtra Politics)

Maharashtra Politics : "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द

ठाकरे गटाने सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, एन.एस.सी.आयय वरळी-मुंबई येथे मंगळवारी (दि.११)  महापत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र-अपात्रतेच्या निर्णयासंदर्भात पुरावे देत खुलासा केला. यानंतर विरोधीगटातून ठाकरे गटावर टीका करु लागले आहेत. भाजप नेते आशिष शेलार यांनी आपल्या 'X' खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की,

"दुर्योधन आणि शकुनी मामाच्या धोका आणि "महा" कपटामुळेच "महा"भारताचे युध्द झाले. म्हणून पांडवांच्या हातून सर्व कौरवांचा "महा"नाश झाला. तसेच नेहमी एक खोटं लपवण्यासाठी "महा" खोटे बोलावे लागते! मुख्यमंत्रीपदासाठी "महा"कपट, "महा"धोका केला नसता, अडीच वर्षे..असं काही ठरलं नसताना ही "महा"खोटं बोलला नसता, रोज सकाळी खोटं बोलणाऱ्या "महा" शकुनीला आवरले असते, तर अशी "महा" पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली नसती. जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे ईश्वर!!जय श्रीराम!!"

आशिष शेलार यांच्या या टीकेनंतर ठाकरे गट काय प्रतिक्रिया देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहीले आहे.

 हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news