महाराष्ट्र पोलिसांचा युपीत डंका: पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला, पुरुष संघाची बाजी

महाराष्ट्र पोलिसांचा युपीत डंका: पोलीस क्रीडा स्पर्धेत महिला, पुरुष संघाची बाजी
Published on
Updated on

ठाणे: संतोष बिचकुले : अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेत (२०२२-२३) महाराष्ट्र पोलीस दलाच्या महिला व पुरुष संघांनी खो- खोमध्ये बाजी मारली. या स्पर्धेत वियजी ठरलेल्या दोन्ही संघांना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांच्या हस्ते चषक देऊन सन्माानित करण्यात आले.

अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन सशस्त्र सीमा दलाने लखनौ येथे केले होते. २१ ते २५ मार्च दरम्यान रंगलेल्या सायकलिंग, अ‍ॅथलॅटीक व खो – खो या क्रीडा स्पर्धांसाठी देशभरातील ३२ राज्य पोलीस दलाचे संघ सहभागी झाले होते. खो- खो स्पर्धेत अंतिम सामन्यात महाराष्ट्र पोलीस महिला संघाची राजस्थान पोलीस संघासोबत लढत झाली. यावेळी महाराष्ट्राच्या महिला पोलीस संघाने ५ मिनिटे राखून ७-६ ने विजय मिळवला. तर, महाराष्ट्र पोलीस पुरुष संघाविरुद्ध कर्नाटक पोलिसांमध्ये सामना रंगला.

महाराष्ट्राच्या संघाने एक डाव राखत ११-८ ने उत्कृष्ट विजय मिळवला. या दोन्ही संघासाठी व्यवस्थापक म्हणून मुंबईच्या आर. ए. के. मार्ग पोलीस दलाच्या पोलीस निरीक्षक लिलाधर पाटील यांची निवड करण्यात आली होती. पुरुष संघाला ठाणे पोलीस दलाचे प्रशिक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र म्हात्रे यांचे तर महिला संघाला मुंबई पोलीस दलाचे हवालदार जगदिश दवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

महाराष्ट्राची सुवर्ण नोंद

अखिल भारत क्रीडा स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच खो -खो क्रीडा प्रकाराला मान्यता देण्यात आली होती. पहिल्यांदाच भारतातील राज्य पोलीस दलाच्या १४ संघांनी खो -खो क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. या सर्व संघांमध्ये महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांनी विजय मिळवून या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण नोंद केली आहे.

महिला संघ –

शुभांगी जाधव- मुंबई, (कणर्धार), सुंधरा वैद्य- मुंबई, अर्चना पाटोळे- मुंबई, कल्याणी लोणारे- मुंबई, स्मिता भोईटे – मुंबई, सपना अंबावले- मुंबई, दीपाली जाधव – मुंबई शहर, प्रणाली कवडे – मुंबई, अंजली मोरे – पुणे शहर, संगीता पवार – उस्मानाबाद जिल्हा, अंकिता जठारे – कोल्हापूर परिक्षेत्र, समीक्षा घरत – कोकण परिक्षेत्र, प्रियंका भोगावकर – कोकण परिक्षेत्र, संगीता मनकर – कोकण परिक्षेत्र, सरीता चौगुले – कोल्हापूर परिक्षेत्र

पुरुष संघ –

मनोज वैद्य- मुंबई, (कणर्धार), सुनील मोरे- मुंबई, अक्षय मिर्गल- मुंबई, सोहेल शेख- मुंबई, अक्षय खापरे – मुंबई, आकाश हजारे- ट्रेनिंग, हरेश मोरे – ट्रेनिंग, वासिम देसाई – कोल्हापूर, संतोष वाडेकर-कोल्हापूर, प्रशांत कामत- कोल्हापूर, आशिष कावरे – अमरावती, कुशल बनसोडे – कोकण, नितेश पारधे – नागपूर, विशाल गायकवाड – मुंबई, अमोल कोळेकर – राज्य राखीव पोलीस दल.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news