शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे अडचणीत? बलात्काराच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी करा; विधान परिषद सभापतींचे आदेश

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे अडचणीत? बलात्काराच्या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी करा; विधान परिषद सभापतींचे आदेश

पुढारी ऑनलाईन: बाळासाहेबांची शिवसेना आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी एका महिलेवर बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दा शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला. या मागणी नंतर डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चौकशीचे आदेश दिले.

विधीमंडळ सभागृहात आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. नागपूरमधील एनआयटी भूखंड प्रकरणी बॅकफूट गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियान आत्महत्या प्रकरणी पुन्हा चौकशीची मागणी करत आक्रमक भूमिका घेतली. विधिमंडळातील गदारोळामुळे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले होते. दरम्यान विधान परिषदेत खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी रान उठवले होते. त्यामुळे विधान परिषदेचे कामकाजही काही काळ स्थगित करण्यात आले होते.

विधान परिषदेच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी खासदार राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला. त्यात त्यांनी म्हटले की, खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात पोलीस आयुक्त यांच्याकडे देखील तक्रार केली आहे. मात्र पोलिसांचा संबंधित पीडितेवर दबाव आहे. पीडित तरुणीला मुंबईत यायचे आहे. मात्र, या दबावामुळे ती मुंबईत येऊ शकत नाही. या मी प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच या पीडित तरुणीच्या जीविताला धोका असल्याचे कायंदे यांनी म्हटले. एसआयटी स्थापन करून राहुल शेवाळे यांची चौकशी करा, अशी जोरदार मागणी आमदार मनिषा कायंदे यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news