महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर लाखो रुपयांची सूट, राज्य सरकारची ‘अर्ली बर्ड बेनिफिट’ स्कीम

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक कार खरेदीवर लाखो रुपयांची सूट, राज्य सरकारची ‘अर्ली बर्ड बेनिफिट’ स्कीम

पुढारी ऑनलाईन: जर तुम्हालाही स्वस्तात इलेक्ट्रिक वाहन घ्यायचे असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अर्ली बर्ड बेनिफिट स्कीमद्वारे 2.5 लाख रुपयांपर्यंत बचत करू शकता. महाराष्ट्र सरकारने निवडक इलेक्ट्रिक वाहन खरेदीदारांसाठी अर्ली बर्ड बेनिफिट स्कीम 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे. या योजनेअंतर्गत, टाटाच्या नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्हीवर फोर-व्हीलर सेगमेंटमधील दोन मॉडेल्सचा लाभ घेता येईल. महाराष्ट्रात, या योजनेतून ईव्ही पॉलिसी अंतर्गत एकूण सूट 2.5 लाख रुपयांपर्यंत आहे.

ईव्ही पॉलिसी अंतर्गत, बॅटरी क्षमतेच्या प्रति KWh साठी 5,000 रुपये प्रोत्साहन दिले जाते. जे कमाल 1.50 लाख रुपयांपर्यंत असू शकते. या प्रकरणात, अर्ली बर्ड योजनेसाठी पात्र असलेल्या Nexon EV च्या खरेदीदारांना 2.5 लाख रुपयांची सूट मिळते. यामध्ये अनुदान म्हणून 1.5 लाख रुपये आणि र्ली बर्ड प्रोत्साहनासाठी 1 लाख रुपयांचा समावेश आहे. यानंतर Tata Nexon EV च्या किमतीत मोठी घट झाली आहे. त्याचवेळी टिगोर ईव्हीचे सर्व प्रकार अनुदानित आहेत, जे अतिरिक्त अर्ली बर्ड फायद्यांसह बाजारात उपलब्ध आहेत.

Tata Nexon EV आणि Tigor EV ची वैशिष्ट्ये

Tata Nexon EV ला 30.2 kWh लिथियम-आयन लिक्विड कूल्ड बॅटरी पॅक मिळतो. त्याची शक्तिशाली इलेक्ट्रिक मोटर 127bhp पॉवर आणि 245Nm पीक टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही इलेक्ट्रिक SUV एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 312 किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 13.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

Tigor EV 11.99 लाख रुपये, एक्स-शोरूमच्या किमतीत उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. टिगोर EV कारची इलेक्ट्रिक मोटर 73.75 hp पॉवर आणि 170 Nm पीक टॉर्क जनरेट करते. तथापि, एकाच चार्जवर Tigor EV ची ड्रायव्हिंग रेंज Tata Nexon पेक्षा कमी आहे. कार IP67 रेट 26 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅकसह येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news