पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्वोच्च व उच्च न्यायालय निकालांच्या मराठी भाषांतरासाठी राज्य सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्य सरकारने न्यायालयांचे निकाल इंग्रजीतून मराठीत भाषांतर करण्यासाठी सॉफ्टवेअर खेरीदसाठी ६ लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर केला आहे. (Judgments into Marathi)
महाराष्ट्र सरकारने १ ऑगस्ट रोजी मंजूर केलेल्या ठरावानुसार मायक्रोसॉफ्ट फॅमिली सॉफ्टवेअर आणि गुगल ट्रान्सलेटर खरेदी करण्यासाठी ६ लाख ४७ हजार ३२०रुपे निधी मंजूर करण्यात आला आहे. मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने इंग्रजी निकालांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी पुढाकार घेतला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सहाय्यक कायदेशीर अनुवाद समितीने त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्याची विनंती राज्य सरकारला केली होती. (Judgments into Marathi)
राज्य सरकारने एक ठराव जारी केला असून उच्च न्यायालयाच्या अपील शाखेत कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषेसाठी 300 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. निवृत्त न्यायिक अधिकारी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, तसेच विद्यापीठांनी शिफारस केलेले वकील, कायद्याचे विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञ यांच्या समूहातून अनुवादकांना बाह्य यंत्रणेद्वारे नियुक्त केले जाऊ शकते, असे या ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. अनुवादकांना प्रति पृष्ठ पेमेंट करण्याचा अधिकार असेल, असे ठरावात नमूद केले आहे.
हेही वाचा :