महाराष्ट्राचा विकास झाला तर देश विकसित होईल : नरेंद्र मोदी

महाराष्ट्राचा विकास झाला तर देश विकसित होईल : नरेंद्र मोदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र विकसित झाला तर देश विकसित होईल. जगात महाराष्ट्रच्या विकासाचीच चर्चा आहे. आज 1 लाख स्टार्टअप देशात तयार झाले. त्यात पुण्याचे मोठे योगदान आहे. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात व्यक्त केले. मोदी यांनी पोलीस मुख्यालयातील मैदानावरच्या कार्यक्रमात मराठीत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, ऑगस्ट महिना क्रांतीचा महिना आहे.

पुणे हे क्रांतिकारकांचे शहर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुण्याचे योगदान मोठे आहे. यावर टाळ्या पडल्या. नंतर हिंदीत बोलताना त्यांनी सांगितले, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्यांच्या साहित्यावर देशात विद्यार्थी संशोधन करतात. आज पंधरा हजार कोटींच्या विकास प्रकल्पाचे उदघाटन मी केले. पाच वर्षात 24 किमी मेट्रोचे जाळे तयार झाले आहे. देशात केवळ 5 शहरात मेट्रो होती आज 20 शहरात मेट्रोचा विस्तार झाला आहे.

आता कोथरूड कचरा डम्पिंग यार्ड राहणार नाही

ते म्हणाले,आम्ही कचऱ्या पासून वीज तयार करणार आहोत.कोथरुड येथील कचऱ्या पासून वीज निर्मिती करणार आहोत त्यामुळे महापालिका आता स्वयंपूर्ण तर होईल आणि कचऱ्याचा त्रास होणार नाही.

जगात महाराष्ट्राची चर्चा..

महाराष्ट्र विकसित झाला तर देश विकसित होईल.जगात महाराष्ट्र च्या विकासाचीच चर्चा आहे.आज 1 लाख स्टार्टअप देशात तयार झाले.त्यात पुण्याचे मोठे योगदान आहे.राज्यात चोफेर विकास आहे पण कर्नाटकात काय होत आहे तिथे नुसत्या घोषणा होत आहेत.बंगरुळ च्या विकासासाठी पैसे नाहीत.राजस्थानात हीच स्थिती आहे.असेही त्यांनी सांगितले.

12 हजार घरकुलांचे वाटप..

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मंगळवारी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, मेट्रो आणि पीएमारडीएच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उदघाटन झाले. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील 12 हजार घरकुले लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, विधान सभेच्या सभापती नीलम गोरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

लोकमान्य पुरस्काराने मोदींना बळ मिळाले : मुख्यमंत्र्यांनी शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान मोदी यांना बळ मिळाले आहे. आज शहरातील अनेक विकासकामांचे उदघाटन झाले. त्यांचे कौतुक देशातच नव्हे तर विदेशात होत आहे. या वाक्यावर मोदी..मोदी ..घोषणेचा गजर झाला. जे पन्नास वर्षात झाले नाही ते नऊ वर्षात मोदींनी करून दाखवले.

पुणेकरांच्या सहनशीलतेला सलाम : अजित पवार

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मेट्रोची कामे सुरू असताना अडचणी आल्या पण तुम्ही तो त्रास सहन केला त्यामुळे मी पुणेकरांनाच्या सहनशीलतेला सलाम करतो. स्वस्तात घरे आज पंतप्रधान मोदी देत आहे .त्यांनी दिलेले घर विकण्याचा विचार करू नका.

विकासासाठी तीन पक्ष एकत्र देवेंद्र फडणवीस

मागच्या उदघाटनाला वेगळे रोल होते मी तेव्हा विरोधी पक्षनेता होतो. पण आता शहराच्या विकासासाठी एकत्र आलोय. देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक बसेस पुण्यात दिल्या आहेत. पिंपरी चिंचवडच्या वेस्ट टू एनर्जी प्लॅन्ट चे उदघाटन झाले. प्रधान मंत्री आवास योजनेत 12 हजार घरांचे हस्तांतर झाले. असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

मेट्रोच्या विस्तरीत मार्गाचे उद्घाटन..

यावेळी शहरातील मेट्रोच्या दोन विस्ताररीत मार्गांचे उदघाटन झाले. सुरुवातीला झालेल्या कामांवर चित्रफीत दाखवण्यात आली तसेच त्यांनी प्रधानमंत्री आवास योज शुभारंभ केला. तीन महिला लाभार्थ्यांना चावी देऊन घरे प्रदान केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news