CET 2022 परीक्षा लांबणीवर, जीईई आणि ‘नीट’च्‍या परीक्षांमुळे निर्णय

CET 2022 परीक्षा लांबणीवर, जीईई आणि ‘नीट’च्‍या परीक्षांमुळे निर्णय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

महाराष्‍ट्र सामायिक प्रवेश परीक्षा ( CET 2022) पुढे ढकलण्‍यात आली आहे, अशी माहिती उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज ट्‍विटच्‍या माध्‍यमातून दिली. आता CET परीक्षा ऑगस्‍टच्‍या पहिल्‍या आठवड्यात होईल. याची तारीख लवकरच जाहीर करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

काही दिवसांपूर्वी JEE Mains 2022 परीक्षा पुढे ढकलण्‍यात आली होती. याच काळात वैद्‍यकीय प्रवेश परीक्षा NEET ही होत आहे. त्‍यामुळे MHT CET 2022) परीक्षा पुढे ढकलण्‍याचा निर्णय घेण्‍या आल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटलं आहे. JEE आणि NEET परीक्षांच्या मुळे CET परीक्षा ऑगस्ट पहिल्या आठवड्यात होईल. या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केले जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

सीईटी परीक्षेच्‍या तारखेमध्‍ये बदल झाल्‍याची अफवा पसरत होती. त्‍यामुळे उच्‍च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परीक्षा पुढे ढकलण्‍यात आल्‍याचे ट्‍टिवरच्‍या माध्‍यमातून सांगितले. जीईई, नीट आणि सीईटी परीक्षा एकाच दिवशी  असू नयेत, अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होत होती. त्‍यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्‍यात आल्‍याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news