Maharashtra Board SSC Result 2023: प्रतीक्षा संपली, उद्या दहावीचा निकाल

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुणे, पुढारी वृत्तसेवा: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा अखेर संपली असून शुक्रवारी (दि.2 जून) दुपारी 1 वाजता इयत्ता दहावीचा निकाल मंडळाने जाहीर केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. ही माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे. (Maharashtra Board SSC Result 2023)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.10 वी) घेण्यात आली होती. गेल्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल लागला होता. तेव्हापासून दहावीच्या निकालाकडे विद्यार्थ्यांचे डोळे लागले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल. (Maharashtra Board SSC Result 2023)

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. ही छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.

या संकेतस्थळावर पाहता येणार निकाल

या संकेतस्थळावर मिळेल अतिरिक्त माहिती

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होणार असून निकालाबाबतचा अन्य तपशील उपलब्ध होईल.

गेल्या काही वर्षांतील दहावीच्या निकालाची टक्केवारी:

2022: 96.94%

2021: 99.95%

2020: 95.3%

2019: 77.1%

2018: 89.41%

2017: 88.74%

2016: 89.56%

2015: 90.18%

2014: 88.32%

2013: 83.48%

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news