SSC Result 2023 Maharashtra Board: दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता

SSC Result 2023 Maharashtra Board: दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता

पुढारी ऑनलाईन: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल गेल्या आठवड्यात जाहीर झाला. आता प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. दहावीचा निकाल केव्हा लागणार याची उत्सुकता सर्व विद्यार्थी आणि पालक यांना आहे. दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखे संदर्भात महाराष्ट्र बोर्डाकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची आहे. महाराष्ट्र बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे. दरम्यान जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेल्या संपामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, हा संप मागे घेतल्यानंतर शिक्षकांनी हे काम प्राधान्याने हाती घेतल्याने बारावी बोर्ड परीक्षा निकाल वेळेत जाहीर झाला आहे. यामुळे दहावीचा निकाल देखील वेळेतच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दहावीच्या निकालासंदर्भात विविध तारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहान बोर्डाकडून केलं गेलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल mahahsscboard.in, mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकणार आहेत.

गेल्या काही वर्षांतील दहावीच्या निकालाची टक्केवारी:

2022: 96.94%

2021: 99.95%

2020: 95.3%

2019: 77.1%

2018: 89.41%

2017: 88.74%

2016: 89.56%

2015: 90.18%

2014: 88.32%

2013: 83.48%

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news