Maharashtra Assembly Winter Session : स्वा. सावरकर मुद्यावर भाजप आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंविरोधात निदर्शने

 Maharashtra Assembly Winter Session
 Maharashtra Assembly Winter Session
Published on
Updated on

नागपूर पुढारी वृत्तसेवा :  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे  पुत्र प्रियांक खर्गे यांनी स्वा. सावरकरांबद्धल केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात भाजपने आज राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली असून नागपुरात निदर्शनांचे आयोजन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी  विधानभवनाच्या पायऱ्यांवर  भाजपच्या आमदारांनी काँग्रेस व उद्धव बाळासाहेब ठाकरे  विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेसचा धिक्कार करतानाच भाजपने या मुद्यावर आता उद्धव ठाकरे यांना देखील लक्ष्य केले असून महाविकास आघाडीचा घटक पक्ष या नात्याने उद्धव ठाकरे यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. ( Maharashtra Assembly Winter Session)

स्वा. सावरकरांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करून त्यांचा फोटो कर्नाटक विधानसभेतून काढून टाकण्याची मागणी करणाऱ्या प्रियांक खर्गे यांच्या वक्त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात भाजपने काँग्रेस व ठाकरे गटाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. भाजपचे आमदार निषेधाचे फलक घेऊन घोषणा देत होते. 'राहुल गांधी हाय हाय', 'मल्लिकार्जून खर्गे हाय हाय', 'उद्धव ठाकरे जवाब दो जवाब दो', 'स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांचा धिक्कार असो', अशा घोषणा दिल्या जात होत्या. काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन असले तरी स्वतःला हिंदुत्ववादी पक्ष म्हणणारा ठाकरे गट या आंदोलनात भाजपचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आता ठाकरे गट या मुद्यावर काय भूमिका घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news