पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच एका बाजुला सत्ताधाऱ्यांचे तर एका बाजुला विरोधी पक्षातील नेत्यांनी निदर्शने केली. आजचा हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस. अधिवेशन सुरु झाल्यापासून हे अधिवेशन खूप चर्चेत आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हीही आक्रमक झाले आहेत. दोन्हीही गटांनी मोठमोठ्याने घोषणाबाजी केली. वाचा सविस्तर बातमी. (Maharashtra Assembly Winter Session)
बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक, राजीनामा द्या राजीनामा द्या, मुख्यमंत्री राजीनामा द्या, द्या खोके, भूखंड ओके, घेतले खोके माजलेत बोके, कर्नाटक सरकार हाय हाय, मिंधे सरकार हाय हाय, राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव, गली गली मे शोर है खोके सरकार चोर है, संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धान्याला भाव मिळालाच पाहिजे, सीमा प्रश्नी भूमिका घ्या, अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा गगनभेदी घोषणा देत सहाव्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी विरोधी गटातील एक फलक लक्षवेधून घेत होता. त्यावर लिहिलं होतं की, "सत्ता आणण्यासाठी भाजपची सवय लागली आहे, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसायची"
तर शिंदे गट आणि भाजप आमदारांनीही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. त्यांच्या हातात, दाऊदशी सबंधित महिलेला पाठीशी घालणाऱ्या युवा सेनेच्या नेत्यावर कारवाई करा" असे फलक दिसत होते.
हेही वाचा