‘महानंद’चे पुढे काय?

‘महानंद’चे पुढे काय?

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई अर्थात 'महानंद'चे संचालक मंडळ बरखास्तीच्या मार्गावर आहे. संचालक मंडळानेच तसा ठराव घेतला असून, 'महानंद'चा सर्व कारभार राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे (एनडीडीबीला) सोपविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. संचालक मंडळ बरखास्त करून पूर्ण कारभार हाती देण्यासोबतच अतिरिक्त कामगार कमी करण्याची अट एनडीडीबीने ठेवली होती. आता सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, 'महानंद'बद्दल काही रंजक माहिती जाणून घेणे यानिमित्ताने गरजेचे आहे.

म्हणून 'महानंद' संकटात

  • अतिरिक्त दूध जादा दराने खरेदी
  • दूध संकलन संस्थांकडून अनियमित दूध पुरवठा
  • कामगारांच्या संख्येनुसार दूध प्रक्रिया न होणे
  • आर्थिक अनियमितता

150 कोटी तोट्याचा सध्याचा आकडा

कर्मचार्‍यांची देणी कुणी द्यायची?

महानंदमधील स्वेच्छा निवृत्ती स्वीकारलेल्या 530 कर्मचार्‍यांची 130 कोटी रुपयांची देणी कुणी द्यायची यावरून आता पेच निर्माण झाला असून, हस्तांतरणाची प्रक्रिया यावरून रखडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एनडीडीबीसमोरील पर्याय…

  • कामगार कपात
  • दुधाच्या नियमित पुरवठ्यासाठी ठोस तजवीज
  • काटकसरीने आर्थिक व्यवहार
  • 'अमूल'कडे महानंद सांभाळायला देणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news