Mahadev Betting Case: कपिल शर्मा, हुमा कुरेशी, हिना खानला ईडीचे समन्स

hina-kapil-huma
hina-kapil-huma

पुढारी ऑनलाईन डेस्क : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीने कॉमेडियन कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि श्रद्धा कपूर तसेच टेलिव्हिजन स्टार हिना खान यांना समन्स बजावले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीने अभिनेता रणबीर कपूरला समन्स बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला समन्स बजावण्यात आले. त्याला आज ईडीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महादेव अॅपचे (Mahadev Betting Case) प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी कथितरित्या सट्टेबाजीतून कमावलेल्या पैशाचा वापर सेलिब्रिटींना पेमेंट करण्यासाठी केला असल्याचा आरोप आहे. (Mahadev Betting Case)

संबंधित बातम्या –

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड आणि टॉलिवूड कलाकारांसह अनेक स्टार्स, खेळाडूंची चौकशी सुरू आहे. यामध्ये आधीच नेहा क्कड, पुलकित सम्राट, रणबीर कपूरसह अनेक जणांची नावे समोर आली आहेत. रणबीर कपूरने सोशल मीडियावर अॅपसाठी जाहिरात केली आहे. रिपोर्टनुसार, आता ईडी आणखी काही सेलेब्सना समन्स बजावणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news